Missing : २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता, शहर पोलिसांत नोंद!

ऑगस्ट 8, 2022 10:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । शहरातील धनाजी काळे नगरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेली २२ वर्षीय विवाहिता घरातून कुणाला काही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

jalgaon 13

तेजस्विनी पाटील (वय २२, रा.धनाजी काळे नगर, जळगाव) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. तरुणीचे वडील सुरेश पाटील यांनी पोलिसांत हरविल्याची फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांची मोठी मुलगी तेजस्विनी ही दि.७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास राहत्या (धनाजी काळे नगर, जळगाव) घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. दरम्यान, पाटील यांनी शहर पोलिसांत हरविल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणी शहर पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास हवालदार संजय झाल्टे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now