लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान!

ऑगस्ट 7, 2022 2:54 PM

ळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त आज रविवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील भाऊंचे उद्यान उद्यान काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलावपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

jalgaon 40

सायकल रॅली मेहरूण तलावाजवळ संपल्यानंतर सदर ठिकाणी लाचलुतपत प्रतिबंधक कायद्याबद्दल व भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती बाबत शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डीवायएसपी शशिकांत एस.पाटील, पीआय संजोग बच्छाव, पीआय एन.एन.जाधव व सर्व अंमलदार व रॅलीमध्ये सहभागी होते. यावेळी उपस्थितांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्रि क्रमांक १०६४ व जळगाव कार्यालयाचा संपर्क क्रमांक, इ-मेल आयडी नमुद असलेले हॅण्डविल वाटप करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now