धक्कादायक : दोघांनी तरुणाला मारहाण करून जबरी पैसे हिसकावले!

ऑगस्ट 3, 2022 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । शहरातील एका भागात २८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवणून दोन जणांनी शिवीगाळ, मारहाण करून त्याच्या खिशातील बाराशे रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 12T162526.461 jpg webp

अल्ताफ शेख सलीम (वय २८) रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदलाल मिल, जळगाव याने पोलिसांत फिर्याद दाखल केली. हा तरूण येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अल्ताफ शेख हा शहरातील गेंदालाल मिल परिसरातील सिटी कॉलनी जवळून पायी जात असताना रस्त्यावर मुसेफ शेख आणि रईस समशेर पठाण दोन्ही रा. गेंदालाल मिल यांनी त्याचा रस्ता अडविला.

काहीही कारण नसतांना शिवीगाळ करून दमदाटी केली आणि त्याच्या खिशातून बाराशे रुपयांची रोकड बळजबरी घेवून पसार झाले. याबाबत अल्ताफ शेख सलीम याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुसेफ शेख आणि रईस समशेर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now