⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | धानोरा विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

धानोरा विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील जुनियर कॉलेजात प्राचार्य के. एन. जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ५ वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला.

या भाषण स्पर्धेत ५वी ते १२ वी तुन प्रथम, व्दितीय तथा तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तर परिक्षक म्हणुन साै.पुनम पाटील,प्रा.मिलिंद बडगुजर, वासुदेव महाजन सर यांनी काम पाहिले. यावेळी उपमुख्याध्यापक मनोज चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन प्रा. मिलिंद बडगुजर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.या कार्यक्रमाप्रसंगी चोपडा पंचायत समितीच्या प्रतिनिधी सौ. ममता पाटील, ज्येष्ठ शिक्षक एल. डी.पाटील, एस.एस. कोळी,प्रा. रेखा महाजन, प्रा. एस. सी.पाटील, प्रा.एस.बी. बडगुजर, सी.आर.चौधरी, दीपेश बडगुजर,श्रीमती उषा भिल्ल,आर.बी.साळुंके,ए.पी.शिरसाठ,सी.बी.सोनवणे,देविदास महाजन, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एचडी सोनवणे यांनी तर आभार क्रिडा शिक्षक वासुदेव महाजन सर यांनी मानलेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह