⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Gold-Silver Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज ‘इतक्या’ रुपायांनी घसरले

Gold-Silver Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज ‘इतक्या’ रुपायांनी घसरले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । जगभरात आर्थिक मंदीच्या (Economic recession) भीतीनंतरही सोन्याबरोबरच चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. सर्वसाधारणपणे मंदी, युद्ध आदी संकट आले की सोन्याचे दर वाढतात, पण यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर घसरत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील सोने दरात 30 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,345 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर दुसरीकडे एमसीएक्सवर चांदीचा भाव सकाळी 76 रुपयांनी घसरून 55,335 रुपये प्रति किलो झाला. Gold Silver Rate Today

कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६२०० रुपये प्रति तोळ्यावर गेलं होते. मात्र सोन्याच्या भावात गेल्या दीड वर्षानंतर कमालीची घसरण दिसून आली. याच कारणामुळे सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परताव्याचा परंपरागत पर्याय गुंतवणुकदारांना खुणावत आहे. सोने कमी किंमतीत मिळत असल्याने गुंतवणुकदारांच्या (Investors) त्यावर उड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत.

जागतिक बाजारपेठेत किती घसरण
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अमेरिकन बाजारात आज दोन्ही मौल्यवान धातूंवर दबाव होता आणि सोन्याची स्पॉट किंमत 1,713.47 डॉलर प्रति औंस झाली. मागील बंद किंमतीच्या तुलनेत हे 0.32 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील $ 18.76 प्रति औंस होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.30 टक्क्यांनी कमी आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत एक दिवस आधी ऑगस्ट २०२१ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती.

गुंतवणूकदारांसाठी पुढे काय आहे
जागतिक बाजारात डॉलरच्या वाढत्या ताकदीचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. त्याच्या दबावाखाली सोन्याचा भाव एका वर्षातील नीचांकी पातळीवर गेला आहे. खरं तर, सध्या गुंतवणूकदार फक्त डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत, तर ते सोन्यात विकत आहेत. भारतीय बाजारपेठेत सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर त्याचा वापर कमी झाला आहे. मागणी कमी असल्याने किमतींवरही दबाव असून जागतिक बाजारात पुन्हा तेजी येईपर्यंत सोन्याच्या दरावर दबाव कायम राहील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.