जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । शिंदे गटामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर नेत्यांची हकालपट्टी सुरू असताना बंडखोरीचं लोण युवासेनेतही पोहोचलं आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची युवासेनेतून (Yuva Sena) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिकारऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Adity Thackeray) ‘अॅक्शन मोड’मध्ये आसे असून त्यांनी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना संघटनेतून काढून टाकलं आहे.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पूर्वेश सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत. त्यांच्यावर युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी होती. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असत. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर छापेमारी केली तेव्हा या प्रकरणी विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या मुलांचीही नावं पुढे आली होती. विहंग ग्रुप ऑफ कंपनीतील गैरव्यवहारा प्रकरणी ही चौकशी झाली होती.