जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । मुक्ताईनगरात शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे खडसेंच्या दहशतीमुळे, त्यांच्यावर दाखल झालेल्या केसेसमुळे सहा महिने बाहेर लपून बसले होते. असा किस्सा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी सांगितला.
राज्यात शिवसेनेची सरकार होती मात्र शिवसैनिकांना मान नव्हता, शिवसैनिकांवर खोट्या केसेस होत होत्या असे मुख्यमंत्री म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव संमत करवून घेतला. यावेळी त्यांनी भाषण केले. यात त्यांनी आधीचे सरकार हे कथितरित्या शिवसेनेचे असले तरी राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. काही जणांच्या तडीपार्या करण्यात आल्या. मात्र त्यांची दाद घेण्यात आली नाही. असा आरोप केला
यावेळी त्यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मुक्ताईनगरात शिवसेना उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे खडसेंच्या दहशतीमुळे दाखल झालेल्या केसेसमुळे सहा महिने बाहेर लपून बसले होते. त्यांना मी धीर देत आता आपले सरकार आले असल्याने कुणाला घाबरू नका अस सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय शत्रुत्व हे जगजाहीर आहे. दोन्ही गटांमधील खुन्नस ही अनेकदा पोलीस स्थानकापर्यंत गेलेली आहे. या पार्श्वभूमिवर, आज यावर विधानसभेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.