इनोव्हाची दुचाकीला धडक, दोघे जिवलग मित्र जागीच ठार, एक गंभीर

जून 29, 2022 11:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । इनोव्हा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जिवलग मित्र जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास सुनसगाव फाट्याजवळ घडला. यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

accident 30 jpg webp

जीवन शिवाजी कोळी (वय 25), विकास संजय पाटील (वय 27) दोघे रा. माळपिंपरी असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवार रात्रीच्या सुमारास सुनसगाव फाट्याजवळ गाडीने जबर धडक दिल्यामुळे दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जीवन कोळी व विकास पाटील दोघे जिवलग मित्र होते. सुखा-दुखात सोबत राहणारे होते. या घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालम सिंग राजपूत, तुकाराम निकम, नाना भोजने, कमलाकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now