जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेना आमदारांनी बंद पुकारले आहे. यामुळे महाविकास आघाडीने बंडखोर आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर एकनाथ शिंदे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पाठवलं आहे.
काय म्हंटल आहे पत्रात?
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
सध्या राज्यात काय परिस्थिती
तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले. त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. शिवसैनिक त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. हाताच शिवसेनेचा झेंडा घेऊन यावेळी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांनी यावेळी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.