⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | कोरोना | Corona Update In Jalgaon Today : आज आढळते तब्बल १२ कोरोना रुग्ण

Corona Update In Jalgaon Today : आज आढळते तब्बल १२ कोरोना रुग्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । मागील काही महिण्यापासून आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा डोकं वर काढताना दिसतोय. जळगाव जिल्ह्यात कोरोना एक दिवसापूर्वी कोरोनाचे ८ रुग्ण आढळून आले होते. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असताना आज गुरुवारी १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

देशात कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागली असून देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्र्रात आढळून येत आहे. यामुळे पुन्हा निर्बंध लागणार का? अशी चिंता सतावत आहे. गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत नव्हती. परंतु गेल्या काही दिवसापासून ती आढळून येत आहे.

काल मंगळवारी जिल्ह्यात ८ कोरोना बाधित रुग्ण होते. तर आज एकही रुग्ण बरा होऊन घरी गेलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५७८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९६८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १८ रुग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५९२ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात-५ , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-६ , अमळनेर-० , चोपडा- १ , पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळले आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.