जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यासाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून योगाचा प्रचार आणि प्रसार भारताकडून वाढला आहे. योगासनांचा लाभ घेत शरीर आणि मनाचे स्वास्थ्य राखले जाते. त्यामुळे या धावपळीच्या युगात योगा आवश्यक असल्याचे मत आरोग्य सहाय्यक सी.पी.पाटील यांनी केले.
२१ जून जागतिक योग दिनानिमित्त धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी उपस्थित रुग्ण व कर्मचाऱ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कवडीवाले, डॉ.मंजुषा भोने, आरोग्य कर्मचारी सी.पी.पाटील, बी.एस.सोनवणे, कल्पना सूर्यवंशी, मोनाली पाटील, भारती सोनवणे, दिपमाला महाजन प्रदीप अडकमोल, राहुल सोनवणे, नितीन महाजन, दत्तात्रय चव्हाण, विलास पवार आदी उपस्थित होते.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. तसेच रुग्णांनी औषधी घेण्याबरोबरच योग केल्यास याचा निश्चित फायदा होतो. यावेळी पाटील यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना योग प्रत्याक्षिका करून घेतल्या.