जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलिसांनी पकडले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर होते. निमगावच्या बसस्थानकाजवळ एक विना क्रमांकांचे ट्रॅक्टर दिसले. हे ट्रॅक्टर पोलिसांच्या पथकाने थांबवले. तपासणी अंती त्यात वाळू दिसून आली. तेव्हा ट्रॅक्टर चालक गोकुळ रघुनाथ सपकाळे (रा.भोलाणे ता.जि.जळगाव) यांच्याकडे वाळू कुठून आणली? त्याचा परवाना आहे का? याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने तो उडवाउडवीची उत्तरे दिली. या ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना वाळूची चोरी करून वाहतूक होत असल्याची खात्री होताच पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले.
या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गोकुळ रघुनाथ सपकाळे (रा.भोलाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करत असल्याची माहिती देण्यात आली.