खा.सुप्रिया सुळे यांचे महापौर जयश्री महाजनांनी केले स्वागत

मे 17, 2022 5:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या जळगाव शहरात आल्या असता त्यांचे अजिंठा शासकीय विश्रामगृहावर आगमन झाल्यावर जळगावच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

supriya sule jayashri mahajan

आपल्या दौर्‍यात आज (17 मे 2022) शहरातील गणपती नगर परिसरातील रोटरी हॉलमध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दृष्टी संवाद – यशवंतराव चव्हाण सेंटरचे व्हिजन डॉक्युमेंट सादरीकरण विशेष संवाद’ या विषयी सकाळी बैठक संपन्न होत आहे. बैठकीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढील वाटचालीसंदर्भात त्या विचार मांडणार आहेत. तसेच शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या आगमनाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now