⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर येथील तब्बल आठ टन कचरा केला संकलित

अमळनेर येथील तब्बल आठ टन कचरा केला संकलित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । डाॅ. श्री नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवंदडातर्फै स्वच्छतादूत तथा पदमश्री पुरस्कार प्राप्त डाॅ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन डाॅ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


यावेळी तब्बल १३० श्री सस्दय सहभागी झाले होते. त्यांनी आठ टन कचरा संकलीत केला.अमळनेर येथील ईदगाॅह कब्रस्थान येथुन ४टन तर समस्शानभूमी पैलाड येथुन ४ टन कचरा संकलीत करुन डम्पींग ग्राऊंड येथे विल्हेवाट लावण्यात आला.याप्रसंगी स्वच्छता अभियानाला आमदार अनिल भाईदास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत सरोदे व प्रभारी प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी भेट दिली.

दरवर्षी श्री सदस्यांच्या स्तुत्य उपक्रम

दरवर्षी राज्यभर स्वच्छता अभियान मोहीम राबवीण्यात येते. आतापर्यंत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, स्वछता मोहीम या उपक्रमानी सर्वत्र श्री सदस्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, समाजोपयोगी उपक्रम यांनी नेहमी सहभाग दिसून येतो.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह