⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने, गुंतवणूकदारांची होरपळ

शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने, गुंतवणूकदारांची होरपळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । आज सोमवारी भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात निराशाजनक पद्धतीने केली. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीने उघडले. निफ्टी 17 हजारांच्या खाली व्यवहार करत आहे. यात गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झाले.

दरम्यान, आशियाच कोरोनाची चौथी लाट आल्याचे बोलले जाते. चीनमध्ये कठोर लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचे पडसाद आज भांडवली बाजारावर उमटले. सकाळी, सेन्सेक्सने 439 अंकांच्या घसरणीसह 56,758 वर खुले व्यापार सुरू केला. निफ्टीनेही 163 अंकांची मजल मारली आणि 17,009 वर खुले व्यापार सुरू केला. घसरणीवर उघडल्यानंतरही, दोन्ही एक्सचेंजेसवर विक्रीचे वर्चस्व राहिले आणि गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे निफ्टी पुन्हा एकदा 17 हजारांच्या खाली गेला. सकाळी 9.27 वाजता सेन्सेक्स 705 अंकांनी घसरून 56,480 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 235 अंकांच्या घसरणीसह 16,950 वर पोहोचला होता.

आज मुंबई शेअर बाजाराच्या ३० प्रमुख कंपन्यांपैकी २६ शेअर घसरले. तर आयसीआयसीआय बँक, पाॅवरग्रीड, एनटीपीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या चार शेअरमध्ये किंचिंत वाढ झाली आहे.

आशियाई बाजारही लाल चिन्हावर
सोमवारी सकाळी आशियातील बहुतांश शेअर बाजार लाल चिन्हावर उघडले. सिंगापूरचे स्टॉक एक्स्चेंज 1.13 टक्के आणि जपानचे निक्केई 1.82 टक्क्यांनी घसरले आहे. याशिवाय तैवानचा शेअर बाजार 1.84 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी 1.54 टक्क्यांनी घसरत आहे. आशियातील सर्वात मोठा शेअर बाजार चीनच्या शांघाय कंपोझिटमध्येही आज सकाळी घसरणीचे वातावरण आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.