हाताच्या गोंदण्यावरून पटली मृतदेहाची ओळख

एप्रिल 18, 2022 3:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत मयताची ओळख पटली नव्हती. मयताच्या हातावरील गोंदन्यावरून आज ओळख पटली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

identity jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि १५ एप्रिल रोजी शहरातील लेंडीनाला जवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२०/२९-३१ दरम्यान ४५ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली होती. यासंदर्भात जळगाव रेल्वे पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिंद्र नगराळे हे करीत होते. दरम्यान हातावर गोंदलेले असल्यावरून मयताची ओळख पटन्यास मदत झाली. रविंद्र रामसिंग कोळी (वय-४५) रा. गोपाळपूरा, विठ्ठल पेठ असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ते घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सारिका, मुले- राहुल व हर्षल, आई सुमन, वडील रामसिंग कोळी आणि कैलास आणि गोपाळ हे दोन भाऊ असा परिवार आहे. १८ एप्रिल रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार अनिंद्र नगराळे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now