बांधकाम कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन

एप्रिल 18, 2022 2:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना आणि सीटूच्या वतीने दि १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.

१२३ jpg webp

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत व बिगर नोंदीत कामगारांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी संघटनेने निवेदन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील सहाय्यक कामगार आयुक्त व कल्याणकारी मंडळाचे कर्मचारी व दलाल यांच्यामार्फत दीड हजार ते दोन हजार घेऊन सुरू असलेली अपात्र नोंदणी बंद करण्यात यावी, पात्र बांधकाम कामगारांची नोंदणीकडे उद्दिष्टपुर्वक दुर्लक्ष केले जात असून कामगारांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, २०१८ पासून पात्र बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळाची थकित लाभ देण्यास टाळाटाळ करण्याऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, नवीन नोंदणी ऑनलाइन दाखल केलेल्या कामगारांच्या नोंदणीस होत असलेल्या दिरंगाईचा चौकशी करण्यात यावी.

अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे. सदर निवेदनावर विजय पवार, प्रवीण चौधरी, हनीफ मुशीर शेख, अजीज खान, रमेश मिस्‍तरी, रऊफ शेख, फारुक शेख, समाधान भालेराव, मुक्तार शरीफ खान सह आदींच्या सह्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now