बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; लाखाचा ऐवज लंपास

एप्रिल 15, 2022 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। १५ एप्रिल २०२२ । बंद घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि साड्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.चोरटयांनी एकूण ९२ हजार ५०० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

crime २

पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, जयेश राजाराम सोनवणे (वय-३०) रा. ओम शांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ एप्रिल दुपारी ३ वाजता ते आपल्या वैयक्तिक कामासाठी बाहेर गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि अडीच हजार रुपये किमतीच्या साड्या असा एकूण ९२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

जय सोनवणे हे गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसून आला. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता घरात सामान अस्ताव्यस्त झालेला दिसून आला व घरातून सोन्या, चांदीचे दागिने आणि साड्या चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या बाबत त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या वरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now