समाज कल्याण विभागातर्फे रक्तदान शिबीर उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटावेत. याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दिनांक 7 मे, रोजी करण्यात आले आहे, त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्येही याचदिवशी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले, शिबीराचे उदघाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, सहा- पोलिस उप निरीक्षक भरत चौधरी , कार्यालय अधिक्षक अरुण वाणी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आर.डी.पवार समाज कल्याण निरीक्षक श्रीमती आशा बोरोले, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती शोभा चौधरी, समाज कल्याण निरीक्षक महेंद्र चौधरी हे उपस्थित होते.
सदरील शिबीरात मोठया प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले यामध्ये जळगाव जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बार्टीचे तालुका समन्वयक व समातदुत व सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी, समाज कल्याण अधिकारी व कर्मचारी इत्यादींनी सहभाग घेवून उत्स्पुर्त प्रतिसाद दिला. शिबीराच्या यशस्वीरित्या बद्दल सहाय्यक आयुक्त यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंडे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे विशेष आभार मानले असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे