⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अल्पवयीन मुलीला २२ महिने डांबून अत्याचार, नराधमाला २० वर्षाची शिक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेत तिला २२ महिने डांबून ठेवून, मारहाण, शिवीगाळ तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी गोलु रामसिंग राठोड, (वय २१ वर्षे, रा. धनवाडा, ता. खिडकीया, जि. हरदा, मध्य प्रदेश, हल्ली रा. समता नगर, जळगाव) याला मे. विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७४ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

शहरातील अल्पवयीन पिडीतेला दि. १६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपी गोलु रामसिंग राठोड, वय २१ वर्षे, रा. धनवाडा, ता. खिडकीया, जि. हरदा, मध्य प्रदेश, हल्ली रा. समता नगर, जळगांव याने फुस लावुन पळवुन नेवून तिला २२ महीने डांबुन ठेवून, मारहाण, शिवीगाळ, जिवे ठार मारण्याची धमकी देवून वारंवार तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. व त्याला श्रीराम राठोड, रामकिसन राठोड, यशोदा राठोड व राजेश चव्हाण, सर्व रा. धनवाडा, ता. खिडकीया, जि. हरदा, मध्य प्रदेश, हल्ली रा. समता नगर, जळगांव यांनी सहकार्य केले.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंदनगर पोलीस स्टेशनला सर्व आरोपींविरुध्द गु.र. क. २१०/२०१९, भा.द.वि. कलम ३६३, ३६६-अ, ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ सह ३४ आणि बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ४, ८ व १२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी गोलु रामसिंग राठोड याला अटक केली. याप्रकरणी मे. विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात खटल्यास सुरवात झाली. सरकारपक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात अल्पवयीन पिडीत मुलगी व डॉक्टरची साक्ष खुप महत्वपूर्ण ठरल्या. मे. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने फक्त आरोपी गोलु रामसिंग राठोड यास दोषी धरीत भा.दं.वि. कलम ३६३, ३६६अ, ३७६ (२) (एन), ३४४, ३२३, ५०४, ५०६ तसेच बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८ व १२ प्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली.

सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता आर. बोरसे यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. मे. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे मे. न्यायालयाने आरोपी क. २ गोलु राठोड यास दोषी धरले आहे. याकामी ऍड. शारदा सोनवणे व पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले. तसेच आरोपीतर्फे ऍड. सुरज जहाँगिर यांनी कामकाज पाहिले.

असे कलम अशी शिक्षा
आरोपी गोलु रामसिंग राठोड, यास बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ५, ६ खाली २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ३०,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महीने सक्त मजूरी, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ४ खाली १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये २०,०००/- दंड व दंड न भरल्यास ४ महीने सक्त मजुरी,बा. लै. अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ८ खाली ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ५,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महीना सक्त मजुरी, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम १२ खाली २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ३,०००/- दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्त मजुरी,भा.द.वि. कलम ३६३ खाली ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ५,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महीना सक्त मजुरी, भा.द.वि. कलम ३६६अ खाली ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ५,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महीना सक्त मजूरी, भा.द.वि. कलम ३४४ खाली २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये ३,०००/- दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्त मजुरी, भा.द.वि. कलम ३२३ खाली ६ महीने सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड व दंड न भरल्यास १ भा.द.वि. कलम ५०४ खाली ६ महीने सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड व दंड न भरल्यास १ आठवडा सक्त मजुरी शिक्षा सुनावण्यात आली आहे.