⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

दुर्दैवी : भरधाव कंटेनरच्या धडकेत प्राचार्य जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दिपक आधार पाटील (वय ४५, रा. भामरे ता. चाळीसगाव ) यांचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना घडली आहे. हा अपघात सकाळी १० वाजजेच्या सुमारास धुळे रोडवरील शांतीदेवी कॉलेजजवळ घडला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी सदर कंटेनरला (क्र.आर.जे- १४ जीजे ८५०८) ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिपक पाटील हे धुळे रोडवरील शांतीदेवी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या दुदैवी घटनेमुळे तालुक्यातील भामरे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आलेली नाही.