जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । जळगाव शहरातील रहिवासी असलेले दोन तरुण पुण्यात शिक्षण घेत होते. बुधवारी रात्री मित्रांसोबत जेवण करून परतत असताना कात्रजजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघातामुळे जळगावात मोठी शोककळा पसरली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील गांधीनगरात राहणारा रोहित शामसुंदर मणियार वय-२२ व समीर काळे वय-२४ हे दोन्ही तरुण पुण्यात उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले होते. बुधवारी ७ मित्र जेवणासाठी कात्रज परिसरात गेले होते. रात्री जेवण आटोपल्यावर ५ मित्र चारचाकीने घराकडे निघाले तर रोहित आणि समीर दुचाकीने जात होते.

कात्रजजवळ झालेल्या अपघातात दोघांचा पहाटे ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मणियार, काळे परिवारासह जळगावात शोककळा पसरली. रोहित मणियार यांचे कुटुंबीय धान्य मार्केटला व्यापारी आहेत.
हे देखील वाचा :
- जळगावात वाहतूक पोलिसांची २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई, सव्वा लाखांहून अधिकचा दंड
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचे ‘द इनव्हिजिबल फायर’ पुस्तक प्रकाशित
- डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
- भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर
- सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी स्वस्त; जळगाव सराफ बाजारातील आजचे दर पहा..












