आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

एप्रिल 2, 2022 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । ठाणे येथे दि. ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाला. त्यात पुरुष संघचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी असणार आहेत.

badmintan spardha jpg webp

निवड झालेल्या संघास जैन इरिगेशनने प्रायोजकत्व दिले. पुरुष संघ : शुभम पाटील, प्रणव पाटिल, गोपाल पाटील, दीपेश पाटिल, कृष्णा अग्रवाल, उमेर देशपांडे, अथर्व शिंदे, ओजस सोनवणे, देवेश पाटिल. महिला संघ : साचि गांधी, राजश्री पाटिल, सुगीता चौधरी, इशिका शर्मा, सौम्या लोखंडे. तर संघासोबत प्रशिक्षक म्हणून किशोर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. संघास निरोप देण्यासाठी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव विनीत जोशी, सभासद चंद्रशेखर जाखेटे खजिनदार अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते. निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन उपाध्यक्ष तेजेंद्रसिंग महिंद्रा यांनी शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now