जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ११९० नवे रुग्ण, तर १५ जणांचा मृत्यू

एप्रिल 8, 2021 8:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. आज गुरुवारी जिल्ह्यात ११९० नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यात जळगाव शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.

corona

आज ११९० रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९८ हजार २८९ इतकी झाली आहे. तर आज ११४२ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८४ हजार ८१३ वर गेली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १७४१ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर २९९, जळगाव तालुका १३, भुसावळ ९६, अमळनेर १००; चोपडा १६८; पाचोरा ३७; भडगाव ३१; धरणगाव ४३; यावल ३२; एरंडोल १२, जामनेर ४१; रावेर ६८, पारोळा ६५; चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ७६; बोदवड ४१ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे ११९० रूग्ण आढळून आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now