जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । नशिराबाद येथील रहिवासी व छत्रपती शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य विश्वनाथ हिरालाल महाजन यांना बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र या विषयातून पी.एचडी प्रदान करण्यात आली.

उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी लैंगिक आरोग्य विषयक जाणीव जागृती कार्यक्रम विकसन आणि परिमाणकारकतेचा अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.













