शेतकऱ्यांची चिंता वाढली, जळगावसह भुसावळमध्ये जोरदार पावसाची हजेरी

मार्च 7, 2022 9:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२। राज्यासह जळगाव जिल्ह्यात आज, सोमवारपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री ९.३० च्या सुमारास जळगाव आणि भुसावळ शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत सापडला आहे.

rain

पश्चिम मध्य बंगाल उपसागर, मन्नारची खाडी आणि तमिळनाडू, पुद्दुचेरीसह दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सोमवारपासून वाऱ्याचा वेग वाढणार आहे. उत्तर किनारपट्टीलगत चक्रवात आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणीय बदलांचे ढग दाटले आहेत. त्यामुळे दहा मार्चपर्यंत उत्तर भारतासह महाराष्ट्रात गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस होईल.

भुसावळ शहरासह परिसरात रात्री ९.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. यासह बदलत्या वातावरणामुळे पुन्हा साथीचे आजार तोंड वढ काढण्याची शक्यता आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now