⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | चांदी दराने ओलांडला ७० हजाराचा टप्पा, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

चांदी दराने ओलांडला ७० हजाराचा टप्पा, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धाच्या (Russia and Ukraine war) पार्श्वभूमीवर मागील काही दिवसापासून सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात मोठी चढ-उतार होत असल्याचे दिसून आले. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज जळगाव (Jalgaon) सुवर्ण नगरीत सकाळच्या सत्रात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८१० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या प्रति तोळ्याचा दर ५४ हजराच्या दिशेने जात आहे. तर दुसरीकडे चांदी १२८० प्रति किलोने महागली असून चांदीने देखील ७० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, यापूर्वी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोने ४८० रुपयाने तर चांदी ९७० रुपयाने महागली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,७९० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ७०,७८० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात पडझड सुरु असल्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणूक वाढवली आहे.तसेच लग्न सराई असल्याने देखील सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. यामुळे सोने-चांदी दरात सध्या मोठी तेजी आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या महिन्याच्या फेब्रुवारीला सोन्याच्या प्रति तोळ्याचा दर ४९००० रुपयापर्यंत होता.मात्र फेब्रुवारीच्या २८ तारखेपर्यंत सोन्याच्या दरात जवळपास २५०० रुपयाची वाढ झाली. तर दुसरीकडे गेल्या महिन्यात चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र गेल्या आठवड्याभरात चांदीच्या दरात तब्बल ४००० रुपयाची वाढ झाल्याचे दिसून येतेय.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,४००, बुधवारी ५३,०३०, तर आज गुरुवारी ५२,५०० रुपये इतका आहे. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५२० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,५२०, बुधवारी ६८,५७०, गुरुवारी ६८,५३० रुपये प्रति किलो इतका होता.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.