जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमधील एका २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (वय-२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगरातील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील हा तरुण फुले मार्केटमधील एका भांड्याच्या दुकानावर कामाला होता. दरम्यान, घरात कोणीच नसल्याने ज्ञानेश्वर याने घरात छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी त्यालाखाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.