जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा उद्या बुधवारीपासून पुन्हा सुरु होणार आहे. तर अहमदाबाद विमान सेवेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा सुरु होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

तांत्रिक कारणामुळे मागील गेल्या १५ दिवसापासून जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा बंद करण्यात आलेली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती, परंतु आता उद्यापासून ही सेवा पुन्हा सुरु होणार आहे. तर अहमदाबाद विमान सेवेसाठी 15 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ट्रु-जेट कंपनीच्या व्यवस्थापकीय समस्या व एअरक्राफ्ट दुरुस्तीच्या कारणाने सेवा 7 फेब्रुवारीपासून बंद आहे.
कंपनीतर्फे आरसीएस उपक्रमांतर्गत देशात 26 विमान तळांवर सेवा दिली जाते. या सर्व ठिकाणी विमानसेवा बंद ठेवण्यात आली मात्र आता ती सुरू बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे राष्ट्रीय विपणन प्रमुख नैमिश जोशी म्हणाले.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले
- जळगाव विमानतळावर मिळणार आपात्कालीन आरोग्य सुविधा
- सुरतच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील हॉटेलमध्ये नेलं अन्.. पुढे घडलं धक्कादायक
- खुशखबर! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’चा मार्ग निश्चित ; जळगावकरांना होणार फायदा?
- फाटलेल्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय ; आता ‘या’ कामात केला जाणार वापर?