सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीमध्येही घसरण, वाचा आजचा भाव

फेब्रुवारी 22, 2022 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत होती. जळगाव सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातील वाढीला ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या दरात किंचित ४० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ३२० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोने २८० रुपयांनी स्वस्त झाली होती. तर चांदी ४० रुपयांनी महागली होती.

gold silver jpg webp

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१,२५० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६५,०८० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रेनच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून सोने चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत आहे. पुढील काही दिवस युक्रेन प्रश्‍नामुळे आगामी काही दिवसांत भाववाढ होणार असल्याचा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे. जळगाव सराफ बाजारात मागील आठवड्यात सोने जवळपास १२५० ते १३०० रुपयांनी वधारले होते. तर चांदीच्या दरात ६०० ते ७०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आलीय.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५०,२७० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,०९०, बुधवारी ५०,५४०, गुरुवारी ५०,७८० आणि शुक्रवारी ५१,५७० रुपये इतका होता.

तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६४,४६० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,७४०, बुधवारी ६४,४७०, गुरुवारी ६४,७८० आणि शुक्रवारी ६५,३६० रुपये इतका होता. गेल्या पाच दिवसात चांदीच्या दरात जवळपास ११०० ते १२०० रुपयाची वाढ झाली आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now