जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिला शेतकरी यांना उभारी देण्यासाठी भरारी फाऊंडेशन व जिल्हा कृषि प्रशासन जळगांवतर्फे ‘शेतकरी संवेदना, उभारी अभियान’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यांच्या गावातील गरज पाहता ३ महिलांना मोठी पिठाची गिरणी, २ महिलांना फुल शटल शिलाई मशीन व १ महिलेला संगणक वितरित करण्यात आले.

आज पावेतो शेतकरी संवेदना अभियाना अंतर्गत भरारी फाऊंडेशनने ५४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना अशा साहित्यांचे वाटप करून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच २२ कर्जबाजारी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी आर्थिक मदत केली आहे. पारोळा तालुक्यातील गरीब गरजू शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे व खतांचे वाटप केले आहे.

आज जिल्हाधिकरी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शारदा रविंद्र पाटील (मोंढाळा), प्रतिभा गोपाल पाटील (खेडी ढोक), लक्ष्मीबाई लक्ष्मण बंजारा (तरडी), सोनाली विजय पाटील (खेडी ढोक), अनिता वसंत पवार (तरडी), वनिता कडुबा शिंदे (वरखेडी) अशा ६ महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मोठी पिठाची गिरणी, फुल शटल शिलाई मशीन व संगणक वाटप करण्यात आले.
प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पारोळा तालुक्यातील ज्या गावात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. अशा गावात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने त्या गावातील १५ शेतकरी मित्रांशी चर्चा करून त्या-त्या गावातील शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेतल्या. तसेच यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी शेती विषयावर आपले विचार वक्त केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते भरारी फाऊंडेशन करत असलेल्या सेवा कार्याची माहिती देणाऱ्या वेबसाईटचे उद्घाटन देखील करण्यात आले. वेबसाईट बद्दल माहिती देत भरारीचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.
केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी गरीब गरजु शेतकऱ्यांसाठी नांगर, टिलर, रोटावेटर देणण्यासाठी मत व्यक्त केले केले. प्रसंगी यावेळी उद्योजक रजनीकांत कोठारी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, कृषि अधिकारी अनिल भोकरे, महेंद्र कोठारी, रविंद्र लढ्ढा, रमेशकुमार मुनोत, प्रीती दोषी, संध्या सुर्यवंशी, जळगांव जनता बँकेचे संचालक सतिश मदाने, हर्षद जैन, नंदलाल गादिया, राहुल पाटील, सपन झुनझुनवाला, कुशल गांधी, अजिंक्य देसाई, निलेश झोपे, आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा कृषि विभाग रजनीकांत कोठारी व दलीचंद जैन यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. तसेच यशस्वितेसाठी विनोद ढगे, सचिन महाजन, दीपक परदेशी, दीपक विधाते, नीलेश जैन, शुभम पाटील यांनी प्रयत्न केले.
हे देखील वाचा :
- डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
- सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरट्यांचा डल्ला; १.३५ लाखांचा ऐवज लंपास
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी मेगाभरती; ग्रॅज्युएट्स तरुणांना नोकरीची संधी..
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर











