जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा केलाय. या दाव्याची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी खिल्ली उडवली आहे.

‘चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केलीय.

‘बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवानं सरकार पडलंच तर बहुमताच्या जोरावर पुन्हा हेच सरकार येणार. सरकार पाडण्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोवर हे सरकार पडणार नाही’, असा दावाही खडसेंनी केलाय.
वाईन विक्रीच्या सरकारच्या धोरणाबाबत विचारलं असता खडसे म्हणाले की, वाईनबाबत एकजण विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहेत. वाईन ही दारू आहे त्यामुळे आण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. मध्यप्रदेशात मॉलमध्ये बियर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशात भाजपला निवडून दिलं. तर दारूही गरिबांच्या हिताची असल्यानं पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ, असं वक्तव्य तेथील प्रदेश अध्यक्षांनी केलं आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवाल खडसे यांनी केलाय.
हे देखील वाचा :
- गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव
- टायर फुटल्याने मजुरांनी भरलेली आयशर पलटी; यावल-फैजपूर रस्त्यावरील भीषण अपघात!
- तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक १३,५०० रुपये; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया
- जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ९५८ किलो गांजाची कायदेशीर विल्हेवाट
- जळगाव-भुसावळकरांसाठी खुशखबर! ‘बडनेरा-नाशिक मेमू’ रेल्वेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ












