जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एरंडोल नगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.०अंतर्गत एरंडोल नगरपालिकाने केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांची पाहणी करण्याकरिता भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ व वृक्ष देऊन स्वागत केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फिल्टर प्लॅन्ट येथे वृक्षारोपण करण्यात आले. व नंतर अभिजित राऊत यांनी न.पा.च्या वसुंधरा पार्क, रोपवाटीका व उदयानाची पाहणी केली. तेथून एरंडोल न.पा.ने करण्यात आलेल्या अंजनी नदी पात्राची साफसफाई व नदी पुनरुज्जीवन उपक्रमांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले व नदी सुशोभिकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच न.पा.च्या घनकचरा प्रक्रिया केंद्रास भेट देवून एरंडोल न.पा. मार्फत घरोघरी जावून संकलन करण्यात आलेल्या सुका कचरा यापासून तयार करण्यात आलेले MRF केंद्र व ओला कचऱ्यापासून तयार करण्यात येत असलेल्या खताची पाहणी केली.

तसेच सदरील खताची गुणवत्तेची पडताळणी केली असता सदर खताचे उत्पादनात आणखी वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रमाणे विविध नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली असता यामध्ये समाधान व्यक्त करुन मार्गदर्शन करण्यात आले. सदर भेटीप्रसंगी एरंडोल नगरपालिकाचे कार्यालय अधिक्षक हितेश जोगी, बांधकाम अभियंता, देवेंद्र शिंदे, सौरभ बागड, विक्रम घुगे व न.पा.कर्मचारी हे उपस्थित होते.
हे देखील वाचा:
- आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय; पालकमंत्री गुलाबराव पाटील
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल












