⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | हवामान | येत्या दोन दिवसांत जळगावसह राज्यातील तापमानाचा पारा घसरणार

येत्या दोन दिवसांत जळगावसह राज्यातील तापमानाचा पारा घसरणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी झपाट्याने हवामान बदल जाणवत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टीचा कहर सुरू असून याचा परिणाम म्हणून येत्या चोवीस तासांत महाराष्ट्रातील तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये आज 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी तामपानाचा पारा घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या चोवीस तासात उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात 2 ते 3 अंश सेल्सिअसने पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस हीच स्थिती कायम राहिल्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

आज महाराष्ट्रातील बारामती याठिकाणी सर्वात कमी 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच साताऱ्यात 11.8, सोलापूर 17, जळगाव 16, पुणे 12, नाशिक 13, सांगली 16.1, मालेगाव 12.4, कोल्हापूर 16.5, महाबळेश्वर 11.9, माथेरान 13.6, नांदेड 18.8, परभणी 18.5, जालना 17, सांताक्रूझ 18, रत्नागिरी 17.9, डहाणू 16.8, ठाणे 18.2, हरनाई 19.3 आणि नागपूरात 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र धुके, थंडी, पाऊस आणि हिमवृष्टीचा एकत्र मारा सुरू आहे. आज पुन्हा एकदा जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान आणि मुझफ्फराबाद याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तुरळक ठिकाणी हिमवृष्टी देखील होणार आहे. यासोबतच आज हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसासह हिमवृष्टी होणार आहे. उद्यापासून उत्तर भारतात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.