कमाल तापमानात घट, दिवसा उन्हाचा चटकाही वाढला

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । गेल्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीची लाट आली हाेती. ही लाट हळूहळू ओसरत असून, तापमान वाढत आहे. साेमवारी कमाल तापमान ३१.८ अंशांवर गेले हाेते. तापमान वाढल्याने दिवसभर उन्हाचा चटका वाढला हाेता. या आठवड्यात तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

tempreture jalgaon

सध्या सकाळी थंडीचा कडाका जाणवतो तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. रात्रीचे तापमान हळूहळू १५ अंशांकडे झेपावत आहे. साेमवारी किमान तापमान ९.७ अंशांवर हाेते. त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत हवामान काेरडे आणि निरभ्र राहील, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तरेतील राज्यावर हाेत असून, सध्या तरी महाराष्ट्राच्या दिशेने येणारे गार वारे थांबले आहेत. वाऱ्याची दिशा बदलली असून, वेगही कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून थंडीची लाट ओसरली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now