जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । पाचोरा येथे डी.आर.एम व अधिकारी यांची पीजे बचाव कृती समिती सोबत पीजे सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

पाचोरा रेल्वे स्टेशनवर पीजे लाईन व स्टेशनची पाहणी करण्यासाठी भुसावळ विभागचे डी.आर.एम केडिया, ॲडिशनल डी.आर.एम मीना व अधिकारी वर्ग आले असताना पीजे बचाव कृती समितीला चर्चा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पाचोरा ते जामनेर पीजे सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

पीजे बचाव कृती समितीतर्फे देशमुख, ऍड. अविनाश भालेराव, सुनील शिंदे, प्रा.गणेश पाटील, ऍड.अण्णा भोईटे, भरत खंडेलवाल, विकास वाघ, नंदू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी







