ग्राहक न्यायालयाचा दणका, निवृत्त वृद्धेला वाढीव पेन्शनचा लाभ द्यावा

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । रेल्वे विभागातून निवृत्त झालेल्या वृद्धेस सात वर्षांपासून वाढीव पेन्शनपासून बँकेने वंचित ठेवले होते. या महिलेस व्याजासह वाढीव पेन्शन द्यावी असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

court order jpg webp

केसरबाई रामचंद्र जेठवे (वय ८७, रा. कंडारी, भुसावळ) रेल्वेत नोकरीस होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्यांना युनियन बँक ऑफ इंडियाच्या कंडारी शाखेतून नियमितपणे पेन्शन मिळत होते. दरम्यान, केसरबाई यांचे वय ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना ३० टक्के वाढीव पेन्शन मिळणे अपेक्षित होते. त्या रेल्वे विभागाची मेडिकल सेवा घेत नसल्याने दरमहा एक हजार रुपये मिळणे आवश्यक होते असे असतानाही त्यांना युनियन बँक ऑफ इंडियाकडून त्रुटीयुक्त सेवा दिली जात होती.

त्यामुळे केसरबाई यांनी ३० सप्टेबर २०२१ रोजी ग्राहक न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीअंती न्यायालयाने केसरबाई यांचा अर्ज मंजूर केला. बँकेने केसरबाई यांना वाढीव पेन्शन व्याजासह द्यावी. मानसिक त्रासापोटी १० हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. केसरबाई यांच्यातर्फे ऍड. राजेश उपाध्याय व लतिब पिंजारी यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now