⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | पारोळ्यात लसीकरणाबाबत जनजागृती, राजू साळुंकेच्या अहिराणी गीतातुन नागरिकांना संदेश

पारोळ्यात लसीकरणाबाबत जनजागृती, राजू साळुंकेच्या अहिराणी गीतातुन नागरिकांना संदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पारोळा शहरात सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून अहिराणी गीतकार राजू साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी अहिराणी गीतातून लोकांना संदेश दिला जात आहे.

सविस्तर असे की, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून तिसरी लाट भयावह मानली जात आहे. शासनाकडून दररोज मार्गदर्शक सूचना येत आहेत. मात्र नागरिक बेफिकीरपणे गर्दी करताना दिसत आहे. त्यातच ग्रामीण भागासह शहरात देखील अनेकांनी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी लसीकरणाकडे वळावे. तालुक्यात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे. या भावनेतून शहरातील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था व संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून अहिराणी गीतकार राजू साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने लसीकरणाचा प्रत्येक ठिकाणी संदेश पोहचावा व लसीकरणाचे फायदे याबाबत परिसरात जनजागृती व्हावी.यासाठी अहिराणी गीतातून लोकांना संदेश दिला जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून आपण देखील या महामारी च्या काळात सहकार्य करावे. यासाठी संस्थेने जनजागृतीसाठी लसीकरणाचा जास्तीत जास्त टक्का वाढावा. यासाठी प्रयत्न करीत आहे.

याकामी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी‌‌ व मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियावर लसीकरण बाबतचे जनजागृती गीत नागरिकांच्या मनाला भावनिक आवाहन देत असून यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव आशा पाटील पारोळा हे सामाजिक बांधिलकीतून आरोग्य सेवेबाबत क्षयरोग निर्मूलनासाठी सहकार्य करीत आहे.
क्षयरोग निराकरण सोबत जास्तीत जास्त लोकांची लसीकरणाची भीती दूर व्हावी. हा उदात्त हेतू ठेवत अहिराणी भाषेतून लोकांना समजेल अशा पद्धतीने गीत तयार करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी या गीताच्या माध्यमातून लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घ्यावा. व प्रशासनास सहकार्य करावे हा त्यामागील हेतू आहे.
राजू साळुंके यांनी कोरोणाच्या पहिला लाटेत समाजात जनजागृती व्हावी. यासाठी गीत तयार केले होते.

दरम्यान कोरोणाचा संसर्ग वाढत असून लोकांनी सामाजिक आंतर तोंडाला मास, गर्दीत जाणे टाळणे याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना पारोळा तालुका प्रशासनाने केल्या आहेत. कोट-कोरोनाची महामारी अतिशय भयंकर असून शासन युद्धपातळीवर वेळोवेळी मार्गदर्शन सूचना जारी करीत आहे. आपण देखील सामाजिक बांधिलकी जोपासावी. या भावनेतून गीतकार साळुंकेच्या मदतीने अहिराणी भाषेतून प्रबोधन करण्याचे काम संस्था करीत आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह