⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

नाथाभाऊ सुनबाईच्या प्रचारासाठी मैदानात ; मंत्री गिरीश महाजन म्हणतात, आधी…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपात पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप त्यांचा भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळत नसून अशातच एकनाथ खडसे सून आणि भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मात्र, खडसेच्या या कृतीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी टीका केली आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न देता भाजपचे काम करत असल्याने लोकांमध्ये गैरसमज होत आहे, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना सुनावले आहे.गिरीश महाजन शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधत असताना त्यांनी नाथाभाऊंना लक्ष केलं.

एकनाथ खडसे कधी महणातात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे आहेत. यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.