जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । वंचितांच्या कल्याणासाठी सामाजिक न्यायच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी करतांना ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून पोस्टल बॅंक द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वितरित करण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.
पारोळा महसूल व तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एरंडोल प्रांताधिकारी मनिष गायकवाड, पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, पेन्शन आपल्या दारीसाठी लाभार्थ्यांची पोस्ट बॅकला यादी देण्यात यावी. वंचित लाभार्थ्यांच्या हातात पेन्शन मिळाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. शहरातील स्वच्छतेसाठी लोक सहभागाच्या माध्यमातून कामे करण्यात यावीत. गौण खनिजे, अवैध वाळू धंद्यांवर कारवाई करण्यात यावी. केसनिहाय काम करण्यात यावेत. वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी. अवैध वाळू व नियमित गौतम खनिजांची वसूली वाढविण्यात यावी. सर्व मंडळाधिकारी यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के वसूली करावी. पोटखराब जमीनींसाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे. ई-क्यूजी कोर्टवर नोंद करण्यात यावी. तक्रार नोंद लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. कुळ कायदा नोटीस बजावण्यात यावी. आपली तक्रार नोंद जवळपास शून्यावर ठेवण्यात यावी. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. फेरफार वेळेत करू घ्या. रोजगार हमी योजनेत लोकोपयोगी कामे करण्यात यावीत. आयुष्यमान भारत, रेशनकार्ड, जॉब कार्ड या तीन योजनांसाठी मुख्यतः आधारकार्ड लागते. आधारकार्ड सिडिंगचे काम पूर्ण वेळेत करण्यात यावे. सेवा पंधरवड्यात जनतेची कामे मार्गी लावण्यात यावीत. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले, वृक्षारोपणाची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. शासकीय नियमानुसार कामे करावीत. बंधारे, गोठा, पाणंद रस्त्याची रोजगार हमी योजनेतून कामे करण्यात यावीत. धान्य गोदाम तपासणी करण्यात यावी. आनंदाचा शिधा, घरपोच धान्य वाटप, प्रत्येक गावात स्मशानभूमी झाली पाहिजे. सलोखा योजनेमध्ये कामे करण्यात यावीत. एमपीडीए, हातभट्टी, हद्दपारी या मोहीमेचे आयोजन करण्यात यावे. केली. मतदान केंद्रावर तहसीलदार, बीडीओ व पीआय यांनी स्वतंत्र भेट देवून तेथील असुविधांचा आढावा घ्यावा.१८ ते २० वयोगटातील मतदार शोधण्यासाठी मोहीम राबवावी.
२०१९ निवडणूकीमधील साक्ष अभावी केसेस न्यायालयात प्रलंबित ठेवू नये. या केसेस ९ आॅक्टोंबरपर्यंत निकाली काढावेत. शस्त्रपरवानांची तपासणी करण्यात यावी. जलजीवन मिशनच्या कामांचा पाठपुरावा करण्यात यावा. जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. जिल्हा नियोजनाच्या कामांचा पाठपुरावा करावा. रमाई आवासच्या कामांना गती देण्यात यावी. वसूलीसाठी स्पीड वाढवावा. महसूल व ग्रामपंचायतीनी समन्वयाने काम करून वसूलीची प्रमाण वाढवावे. बियाणे तपासणी शंभर टक्के करण्यात यावे. हवामान केंद्रे योग्य रितीने कार्यरत करण्यात यावी. पीएम किसान ई-केवायसी गतीने करण्यात आले यावे. पारोळा – कासोदा रस्त्यांचे काम पूर्ण करा. जलयुक्त शिवार ०.२ मध्ये कामांची गती वाढवावी.अशा सूचना ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या. ई-चावडी, ई-पीक पाहणी, फेरफार, वसूली, पंचनामा आदी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला.