जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । शहरातील जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विविध ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल या होत्या. तर अकॅडमिक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा व एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ.मकरंद वाठ हे यावेळी उपस्थित होते.
मॅनेजमेंट, अभियांत्रिकी व कनिष्ठ महाविध्यालय या तिन्ही विभागात घेतल्या गेलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. तसेच रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले कि, ज्या मातेने बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बाळकडू रुजविले अशा रणरागिणी राष्ट्रमाता जिजाऊ व ज्यांच्या मुखातून अमेरिकेमध्ये उस्फूर्तपणे भारत भक्तीचे स्तोत्र स्फुरले व ध्यानप्रियता अध्ययनशिलता व चित्ताची पवित्रता या गुणांनी युक्त असणारे एक अद्भुत व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या अल्पकाळात मानवितेचे नवीन विचार नव भारताचा शोध, रामकृष्ण मिशनची स्थापना यासारखे अनेक कार्य केले, अशा महान व्यक्तिमत्त्व बद्दलचा आदर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात साठवून ठेवावा.
यावेळी वाद-विवाद स्पर्धा, पोस्टर प्रेझेन्टेशन, निबंध लेखन यासारख्या विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पोस्टर प्रेझेन्टेशन या स्पर्धेत “रोल ऑफ युथ” पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर हा तसेच क्लीन इंडिया-ग्रीन इंडिया हे दोन विषय विध्यार्थ्यांना देण्यात आले होते. तर वाद-विवाद स्पर्थेत रोल ऑफ टुडे युथ इन प्रेझेंट स्कॅनीरीओ तर ऍनी टाॅपीक अबाउट युथ हे दोन विषय विध्यार्थ्यांना देण्यात आले होते. तर निबंध लेखन या स्पर्धेत स्वामी विवेकानंद एक्सपेक्टेशन फॉर्म द यंग व आत्मनिर्भर भारत हे विषय देण्यात आले होते.
यावेळी पोस्टर प्रेझेन्टेशन या स्पर्धेत गणेश पाटील हा विध्यार्थी प्रथम तर अनुष्का जाधव ही विध्यार्थीनी द्वितीय आली तसेच वक्तृत्व स्पर्धेत भूषण अडकमोल, शाहनवाज सय्यद व दक्षता महांगडे या विध्यार्थ्यानी यश संपादन केले. कार्यक्रमासाठी स्टुडंट कॉन्सील व प्रा. वसिम पटेल यांनी सहकार्य केले. तसेच शाहनवाज सय्यद यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या ऑनलाईन कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..