⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

महिलांसाठी खुशखबर : ब्युटीपार्लर, जिम 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नवीन निर्बंध जारी केले होते. शासनाने सलून ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देत ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचे सांगितले होते. शासनाने रविवारी नवीन सुधारित आदेश जारी करीत ब्युटी सलून आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजेच केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र ब्युटीपार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत. नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा :