⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; एक जण कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । कोरोना व्हायरसचा जेएन १ हा नवीन व्हेरिएंट देशात झपाट्याने पसरत असून जळगाव जिल्ह्यात देखील कोरोनाने पुन्हा एंट्री मारली आहे. भुसावळातील एका रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट देशात झपाट्याने पसरत असून याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी चाचण्यांना वेग आलेला आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून भुसावळातील ४३ वर्षाचा रूग्ण हा कोरोनाने बाधीत आढळून आला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

संबंधीत रूग्णाची प्रकृती ही धोक्याबाहेर असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी तो आधी इतका धोकेदायक नसल्याची माहिती तज्ज्ञांनी आधीच दिलेली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.