वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करावे ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला

ऑगस्ट 16, 2023 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन (Ashok Jain), सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी शरद पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

jain meet sharad pawar jpg webp

यावेळी शरद पवार यांच्यासमवेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, आशिष भिरूड, अजय काळे, जैन इरिगेशन सिस्टीम चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॕ.अनिल ढाके, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी कृषीशिक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या तंत्रनिकेतनामुळे मोठी सोय झाल्याचे निदर्शनास आणुन दिले.

कविवर्य ना. धों. महानोर यांचे गाव असलेल्या पळसखेडा पासून वाकोदचे अंतर चार किमीचे असुन भवरलाल जैन आणि कवि ना. धों. महानोर यांची मैत्री वाकोद गावातूनच लहानपणापासून वाढीला लागली. त्यांच्या आठवणीही हे तंत्रनिकेतन पाहताना जागृत झाल्या. या आठवणींना शरद पवार साहेबांनी यावेळी उजाळा दिला. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाकोदचा वटवृक्ष, वाघूरचे पाणी, मरुभुमीतुन बाहेर पडताना ही भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंची पुस्तके भेट दिली. वाकोदच्या या परिसरात ॲग्रिकल्चर बिएस्सी सुरू करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपिठ उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी अशोक जैन यांना केला.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे गेल्या 13 वर्षांपासुन हे कृषी तंत्रनिकेतन चालविण्यात येत आहे. वाकोदच्या 108 एकर परिसरात प्रात्यक्षिसह हे तंत्रनिकेतन विस्ताराले आहे. सातत्याने कायम अ श्रेणीत, कृषि क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे कॕम्पस, उच्चविद्याविभुषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व सुविधायुक्त वसतीगृह, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय, बीएस्सी ॲग्रीची डीग्री पुर्ण करत असताना कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम देखील एकाच प्रक्षेत्रावर असलेली राज्यातील एकमेव संस्था आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now