जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । उच्च सुशिक्षित तरुणाचे घरात किरकोळ वाद झाले. या संतापाच्या भरात तापी नदीकडे आत्महत्येसाठी निघालेल्या तरुणाला पोलिसांनी जीवदान दिले. ३१ डिसेंबरला रात्री १० वाजेच्या सुमारास यावल रोडवर हा प्रकार घडला. येथील शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे व पोलिसांनी या तरुणाचे मतपरिवर्तन करुन वडिलांच्या स्वाधीन केले.

यावल रोडवरील एका उच्चभ्रू वस्तीमधील सुशिक्षित तरुणाचे घरात किरकोळ भांडण झाले. या रागातून तो तापीपुलावरुन आत्महत्या करण्यासाठी घरातून निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याचे शासकीय सेवेतून निवृत्त झालेले वडील घराबाहेर पडले. यावल रोडवर त्याला थांबवून वडिलांनी मनधरणी केली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या तरुणाने तापी नदीकडे जात आत्महत्या करणाच, अशी धमकी भरली. या दरम्यान ३१ डिसेंबर मुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हे देखील तेथे पोहोचले. तरुणाच्या वडिलांनी त्यांना हतबलतेने हा प्रकार सांगताच. इंगळे यांनी पाठलाग करुन तरुणाला थांबवले. तब्बल अर्धा या तरुणाचे प्रबोधन केले. त्याचा राग कमी झाल्यावर इंगळेंनी त्याच्याकडून शिक्षण व परिवाराची स्थिती जाणून घेतली. यानंतर त्याला वडिलांच्या स्वाधीन केले.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?







