जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । शहरात दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघांनी महिलेचे दागिने लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मेहरूण परिसरात घडलेल्या या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरूण परिसरातील रेणूका हॉस्पिटल समोर संगिता विजय सोनवणे (वय-४२) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या घरात काम करत असतांना अज्ञात दोन भामटे (वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष) आले. त्यांनी तांबा व पितळाचे भांडे पॉलीशी करून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार संगिता सोनवणे यांनी भांडी पॉलीश करण्यास दिले. दोन्ही भांडे चमकदार होताच त्यांनी मंगळसुत्र व टॉप्स देखील आम्ही पॉलीश करून देतो असे सांगितले.
महिलेने दोघांवर विश्वास ठेवत गळ्यातील १२ हजार रूपये किंमतीचे दोन मंगळसुत्र आणि १६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी आणि १२ हजाराचे कानातले टॉप्स असा एकुण ४० हजाराचा मुद्देमाल पॉलीश करण्यासाठी दिला. अज्ञात भामट्यांनी एका डब्यात सोन्याचे दागिने आणि हळद टाकून गॅसवर ठेवण्याचा बहाणा केला. गप्पांमध्ये गुंतवून एकाने हातचालाखी करून डब्यातील दागिने काढून रिकामा डबा गॅसवर ठेवला आणि दहा मिनीटांनी डबा उघडा असे सांगून दुचाकीवरून पसार झाले. दरम्यान महिलेने डबा उघडल्यानंतर दागिने नसल्याचे उघड झाला.
महिलेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना