जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेली आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी चाकणकर यांनी केली.
याबाबत असे की, सोमवारी रात्री मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची किरकोळ तोडफोड झाली असून, रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या हल्ल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली.
काय म्हणाल्या चाकणकर?
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यामधून खडसे सुखरूप बचावल्या आहेत. वाहनाचे नुकसान झाले. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. हल्ला करणारे कोणीही असे सुटता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करून, त्यांना अटक करावे अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
काय आहे नेमकी घटना ?
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. रात्रीच्या अंधारात हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने पळ काढल्यामुळे त्याला पकडण्यात यश आलेले नाही. मात्र शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यातील वाद ताजा असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
पहा व्हिडिओ :
हे देखील वाचा :
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- मतदानाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिला धक्का; काय आहे बातमी वाचा..