जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । चोपडा येथील भगिनी मंडळ संचालित समाजकार्य महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. आशिष सुभाषलाल गुजराथी यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी ‘ग्राम विकासात ग्राम-सभांची भूमिका’ या विषयावरील संशोधन प्रबंधास विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने मान्यता देऊन प्रा.आशिष गुजराथी यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. यासाठी प्रा. गुजराथी यांना प्रा.डॉ. विनोद रायपूरे यांचे मार्गदर्शक लाभले. प्रा. गुजराथी हे समाजकार्य महाविद्यालयात २३ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. ते संस्थेचे समन्वयक म्हणून ही काम पहातात. याबद्दल विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासह अनेकांनी त्यांचे काैतुक केले आहे.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..