⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : लग्न, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध, रात्री जमावबंदी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने शुक्रवारी नवीन नियमावली जाहीर केली होती. शासनाच्या आदेशाला अनुसरून जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन आदेश जारी केले असून २७ डिसेंबरपासून नवीन निर्बंध लागू केले जाणार आहेत.

जाणून घ्या काय आहेत निर्बंध :

दिनांक 24 डिसेंबर, 2021 मध्ये नमूद केल्यानुसार या कार्यालयाचे आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 मध्ये नमूद केल्यानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता दिनांक 25 डिसेंबर, 2021 रोजी रात्री 00.001 वाजेपासून पुढील आदेश होईपावेतो खालील प्रमाणे निर्बंध लागू करीत आहे.

(a) सण साजरा करणे व नविन वर्षाचे स्वागोत्सव करण्याबाबत महाराष्ट्र शासन, गृहविभाग, यांचेकडील दिनांक 24 डिसेंबर, 2021 रोजीच्या परिपत्रकात नमूद मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

b) लग्न समारंभ:- बंदिस्त जागेमध्ये (उदा. Banquet / marriage halis) साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ 100 व्यक्तींच्या मर्यादेत साजरा करता येतील व मोकळ्या जागेत साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ 250 व्यक्तींच्या मर्यादेत किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी जे कमी असेल तो क्षमता लागू राहील.

(c) इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दा होणारे कार्यक्रम बंदिस्त जागेमध्ये केवळ 100 व्यक्तीना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व मोकळ्या जागेत केवळ 250 व्यक्तीच्या मर्यादित किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी जे कमी असेल तो क्षमता लागू हो

(d) वरील प्रमाणे नमूद कार्यक्रमांव्यतिरोक्त इतर कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत ज्या ठिकाणी आसन अता

निश्चित केलेली आहे. अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 पेक्षा जास्त उपस्थिती नसेल व त्या

आसनक्षमता निश्चित केलेली नाही. अशा ठिकाणी 25% उपस्थिती राहील. अशा प्रकारचे कार्यक्रम कृत्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25% पेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही.

(e) क्रिडा कार्यक्रम / स्पर्धा साजरा करतांना प्रेक्षक क्षमता हो एकूण क्षमतेच्या 25% राहील.

(f) वर नमूद कार्यक्रम / स्पर्धा वगळता इतर प्रकारचे मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम (किर्तन, रथोत्सव, पालखी सोहळा, उरुस, कुस्ती, दंगल, यात्रा- जत्रा भरवणे, प्रदर्शने) साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती, जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

(g) रेस्टॉरंट, जिम्नॅशिअम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल / थिएटर्स हे आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेसह सुरु राहतील. याकरीता संबंधित क / मालक यांनी उपलब्ध असलेलो क्षमता व 50% क्षमता जाहिर करणे अनिवार्य राहील.

(h) जमावबंदी : सार्वजनिक ठिकाणी रात्री 09.00 ते सकाळी 06.00 वाजेपावेतो 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई राहील.

(i) कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या पूर्व नियोजित वैधानिक सभा ह्या सभागृहाच्या क्षमतेच्या 25% पेक्षा जास्त व सभागृहात 100 पेक्षा जास्त व्यक्तीची सभा घ्यायची असेल अशा वैधानिक सभा या Online पध्दतीने घेता येतील.

(j) ज्या ठिकाणी कोणत्याही नागरिक / व्यक्तीस येण्याचा किंवा सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल्स, समारंभ, संमेलने (मेळावे), रेस्टॉरंट, जिम्नशिअम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल / थिएटर्स, लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दा होणारे कार्यक्रम इत्यादी ठिकाणी शासन आदेश दिनांक 27 नोवेंबर, 2021 नुसार कॉविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल किंवा 48 तासाच्या आतील कोवि 19 RTPCR निगेटी चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

(k) वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट राहील. तथापि संबंधितांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

(l) पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या निर्बंधातून सुट राहील. तथापि त्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

वरील प्रमाणे जळगांव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बयांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

हेही वाचा :