.. तेव्हाच अजित पवारांनी ऑफर दिली होती ; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

मे 14, 2025 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । आगामी महापालिकासह स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वाहू लागले आहे. विरोध पक्षातील अनेक नेते-मंडळी सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. यातच काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

MAL khadse jpg webp

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या सध्या चर्चा सुरू असून यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं देखील नाव समोर येत आहे. मात्र यावरून एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला त्यावेळी मला अजित पवार यांनी ऑफर दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट आ. खडसेंनी केला आहे.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, अजित पवार यांच्या गटात आमच्या गटातून जळगाव जिल्ह्यातले काही लोक गेले आहेत. ज्यांना जायचं होतं ते गेले. ज्याना राहायचं होतं ते राहिले आहेत. त्यात अजून कोणी त्यांच्या गटात जाईल असं मला वाटत नाही. माझ्यासह जे कोणी उरलेले आहेत, ते कायम शरद पवार यांच्या सोबत असतील. आमच्यासाठी शरद पवार साहेबांचा निर्णय हा आमचा निर्णय असतो. या चर्चांना काहीही अर्थ नाही. अजित पवारांनी आपला वेगळा गट तयार केला आणि राष्ट्रवादी फुटली त्याचवेळी मला अजित पवार यांच्या गटात येण्याबद्दल निरोप देण्यात आला होता. मात्र मी तेव्हाही गेलेलो नाही. आम्ही कायम शरद पवार यांच्या सोबतच राहू, असं खडसे म्हणाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment